आम्ही हरवलेला सु''शांत''..

                     सुशांतसिंग  राजपुत   

                                (Sushantsing Rajput)


                                                                                                                                   


   जन्म: -

              सुशांत सिंग यांचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमधील पटना येथे झाला

करियर :-

टीव्ही अभिनेता म्हणून सुशांतची  कारकिर्द अतिशय यशस्वी ठरली  होती. सर्वप्रथम सुशांत याने 'किस देश में है मेरा दिल' नावाच्या मालिकेत काम केले, त्यानंतर सुशांतने  टीव्ही सीरियल पवित्र  रिश्ता' या मालिकेपासून त्याला प्रसिद्धी मिळाली . यानंतर सुशांतचा  चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. (काई पो छे) या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक केले गेले. इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता चित्रपटात काम मिळण्यासाठी त्याने ऐन यशाच्या शिखरावर असताना मालिकेला बाय बाय  केले व तीन वर्षे वाट बघितली.  काई पो चे नंतर तो शुद्ध देसी रोमान्समध्ये दिसला. सर्वात जास्त चर्चा होत  असेलेल्या नीरज पांडे दिग्दर्शित एमएस धोनीची बायोपिक ज्याने शंभर कोटी जमा केले हा त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचा आणि  सर्वाधिक यशस्वी प्रकल्प  यांनतर    सोनचिरिया आणि केदारनाथ  च्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची  मने जिकली. त्याचा शेवटचा चित्रपट छिछोरे हा  होता ज्यात तो श्रद्धा कपूर  सोबत दिसला होता.सुशांत सिंह राजपुतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा त्यानी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर अकस्मात एक्सिट घेतली  व त्याचा अभिनय असलेला हा शेवटचा चित्रपट आहे त्यामुळे आपण चित्रपट पहाताना थोड्या- फार प्रमाणात भावनिक होतोच ..
सुशांत त्याच्या मुलाखतीमध्ये बोलला होता की जीवनामध्ये पैसा महत्त्वपूर्ण आहे पण पैसा हा सर्वस्व नाही. म्हणून फक्त पैशासाठी नाही तर स्वतःसाठी  जागा.

अश्या या होतकरू,प्रतिभावान अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यामागील कारण आज २ महिने होऊन देखील गुलदस्त्यात त्याचप्रमाणे या सगळ्यामागे होत आहे हे सुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही ; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्न उठत आहेत एकूणच आजपर्यंतच्या सगळ्या घडामोडी पाहता निश्चितच सुशांतचा मृत्यू संशयास्पदच आहे
. लवकरात लवकर सत्य बाहेर येऊन  सुशांतच्या आत्म्याला शांती मिळो....!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या